आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख 3)

स्वाईन फ्ल्यु हा सध्या चर्चेत असलेला आजार. एक समज असा असतो की हल्लीच आढळणार्‍या ह्या आजारासाठी आयुर्वेदात औषधे कशी असतील? ह्या आजाराला आयुर्वेदात काय नाव आहे? हा आजार होऊ नये म्हणून काही औषध घेता येईल का? औषधे असलीच तर ती किती प्रभावी ठरतील? मागे हेच प्रश्न चिकुनगुनिया ह्या आजाराबद्दल विचारले जात होते.. antibiotics हाच एक पर्याय माहीत असलेल्या व्यक्तींकडून हे प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत..

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख २)

कधी कधी साध्या तापासाठी, सर्दी खोकल्यासाठी आपण सहज उपाय सुचवतोच.. पण कित्येक जण ब्लडप्रेशर, डायबेटीस, दमा अशा सारख्या गंभीर अन दीर्घकालीन टिकून असलेल्या विकारांवरही हमखास उपाय सुचवत असतात.. अन जाता जाता, मी पण हेच घेतो / घेते, किंवा माझ्या आईला / वडिलांना झाला होता तेव्हा डॉक्टरने हेच औषध दिले होते.. असले निरर्थक रिमार्क्स पण मारुन जातात.. मी पण एखादे औषध घेतो / घेते म्हणजे ते दुस-याला लागू पडेलच असे नाही.. जर सगळे एवढे सोप्पे असते तर डॉक्टरकी करण्यात कुणी एवढी वर्षे का घालवली असती? डॉक्टर ह्या पदवीची अन शिक्षणाची आवश्यकताच काय? म्हणून डॉक्टरला / वैद्याला त्याचे काम करु द्या अन आपण आपले काम चोख करुया.. (अर्थात औषध घेण्याचे अन पथ्य पाळण्याचे.)

आयुर्वेद – समज आणि सत्य (लेख – १)

आयुर्वेद हा शब्द कुठल्याही ग्रुपच्या, नातेवाईकांच्या गप्पांमधे आला की २ गोष्टी अपोआप सुरु होतात, एक म्हणजे आपल्याला माहीत असलेले मोजके उपाय दुस-याला सुचवायला सुरुवात करणे अन दुसरे म्हणजे आपल्याला असलेली अर्धवट माहिती छातीठोकपणे इतरांना पटवून देणे, तीही नातेवाईक वा मित्रांच्या संदर्भात ऐकलेली.. पण खरेच कधी जाणून नाही घ्यावेसं वाटत की आयुर्वेद म्हणजे नक्की काय? तुळस, ओवा, हिंग असले घरगुती उपचार म्हणजेच फक्त आयुर्वेद का? की सगळे उपाय करुन झाल्यावर राहिलेला उपाय म्हणजे आयुर्वेद? ज्याप्रमाणे रुढी अन शास्त्र ह्यामधे अनेकांचा गोंधळ असतो, तसेच काहीसे हल्ली आयुर्वेदाच्या बाबतीत दिसून येते..

आयोडाईज्ड मीठाचा वापर टाळा…

प्रत्येक वेळी एक नवे फॅड आपल्या देशात येते अन आपण सुद्धा त्यामागे डोळे बंद करुन धावत सुटतो. अशीच काहीशी स्थिती सध्या ‘आयोडाईज्ड मीठ’ ह्या नव्या फॅड मुळे झाली आहे. सध्या सगळ्याच कंपन्यांनी ‘आयोडाईज्ड मीठ‘ बनवायला अन खपवायला सुरुवात केली आहे. पण खपते ती प्रत्येक गोष्ट आपण वापरायलाच हवी असा काही नियम नाही ना. ज्यांना खरोखरीच गरज आहे त्यांनी डॉक्टरी सल्ल्याने आयोडाईज्ड मीठ खावे किंवा जेवणातील इतर पदार्थातून आयोडीनचे प्रमाण थोडे वाढवून घ्यावे. उगीच सरसकट नॉर्मल लोकांनीही ते खात राहणे खरेच आवश्यक आहे का ?